पत्रकारांच्या प्रश्नावर शासन कमालीचे उदासीन…. – ANC News
महाराष्ट्रसंपादकीय
Trending

पत्रकारांच्या प्रश्नावर शासन कमालीचे उदासीन….

यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्र

सोलापूर 21 मे 2020 : आपल्या देशातील पत्रकारिता तशी खूप जुनी आहे पारतंत्र काळात देखील इंग्रजां विरोधात देश स्वात्रंत साठी अनेक पत्रकारांनी लढा दिला आहे प्रसंगी लाठया काठ्या खाल्ल्या आहेत, काळ बदलला वेळ बदलली तशी पत्रकारिता देखील काळानुसार बदलत गेली त्यावेळी चॅनल वगैरे काहीही नव्हते केवळ बोटावर मोजण्याइतके वृत्तपत्र असायचे, पत्रकारांना देखील खूप किंमत, मान असायचा पत्रकारांचा सन्मान, आदर असायचा, आज ती वेळ राहिली नाही, काळाचा महिमा.
पत्रकारांची नोंदणी नाही
देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्षे होत आहेत परंतु अनेक वर्षे वृत्तपत्र मध्ये इमानइतबारे काम करून देखील शासन दरबारी पत्रकार म्हूणन नोंदणी नसल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध योजनेचा लाभ मिळत नसल्याने पत्रकारांची अवस्था अत्यंत दयनीय व बिकट झाली असून अश्या पत्रकारांच्या वृद्ध आई वडील यांच्या आजारीपणात औषध उपचारासाठी पैसे नाहीत ही मोठी शोकांतिका आहे अल्प मानधनवर काम करणाऱ्या पत्रकारांचे आयुष्य जिकरीचे झाले असून तुटपुंज्या मानधन वर जगायचं कसं? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पत्रकार संरक्षण कायद्याचा घोळ
हल्ली नेहमीच पत्रकारांना बातमी लावण्यावरून धमकी मारहाण हल्ले करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून लोकशाही चा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे अश्या वेळी पत्रकारांना संरक्षण मिळायला हवे ते मिळत नाही त्यामुळे पत्रकारिता नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सर्वच जेष्ठ पत्रकारांना वीस हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे
आपले उभं आयुष्य पत्रकार समाज हितासाठी, देश हितासाठी, काम करतोय समाजातील वाईट चाली रीती बाबत लेखन करतो , वाईट घटना समाजासमोर आणतो अशा परिस्थितीत त्याला अनेक वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागते परंतु त्याचे उर्वरित आयुष्य खूप विदारक व भयावय असते, काही पत्रकारांना म्हातारपणी पैसे नसल्याने योग्य उपचार घेता येत नाहीत अश्या पत्रकारसाठी किमान वीस हजार रुपये पेन्शन मिळायला पाहिजे जेणेकरून त्याचे आयुष्य सुखी व समाधानी राहील.
पत्रकारांवर खोटे गुन्हे एक डोकेदुखी
समाजात अनेक पत्रकार एखाद्या घटनेबाबत जीवाची बाजी लावून, जीव धोक्यात घालून बातमी करत आहेत, भ्रष्टाचार उघडकीस आणत आहेत परंतु अश्या प्रामाणिक पत्रकारांचे मनोबल खचण्यासाठी, बदनामी होण्यासाठी पत्रकारांवर खोटे खंडणी सारखे व सरकारी कामात अडथळा आणला म्हूणन खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढत असून यामुळे पत्रकारांचे खच्चीकरण होत आहे ते वेगळेच.
पत्रकारांनी संघटित असणे काळाची गरज
पत्रकारांचे अनेक प्रश्न शासन दरबारात धूळ खात पडून असून पत्रकारांमध्ये एकता नसल्याने दिवसेंदिवस पत्रकारांच्या समस्या वाढत आहेत यासाठी सर्व पत्रकारांनी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उपोषण केले तरच पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागतील
येणारा काळ पत्रकारांसाठी खूपच वाईट असणार आहे याला कारणीभूत म्हणजे पत्रकार मधील भेदभाव असलेली मानसिकता जी अद्याप बदलली नाही.
          अजून वेळ गेलेली नाही पत्रकार मिंत्रानो आपण सर्वजण एकत्र येऊन सरकार ला जाब विचारला पाहिजे आपल्या प्रश्नावर आक्रमक होऊन आंदोलन उपोषण च्या माध्यमातून सरकार वर दबाव आणून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: