“जगण्याने छळले मला, मरणाने सुटका केली” – ANC News
संपादकीय
Trending

“जगण्याने छळले मला, मरणाने सुटका केली”

यशवंत पवार

          हाय हाय ए मजबुरी, सोलापूर एकीकडे शहरातील साथीच्या आजाराने त्राही माम बस्स बस्स करून सोडले तर दुसरीकडे जगावं कसं? पोटच्या लेकराबाळांना काय खाऊ घालायचं? असा प्रश्न आ वासून समोर उभा राहिला आहे एकीकडे यम दुसरीकडे नियम अशी दयनीय व केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे बेरोजगारी वाढती महागाई, हितर पाचवीला पुजलेली आहेच त्यात गरिबी पुरेसं अन्न धान्य दुध चहा तर स्वप्नात येतोय भाकरीचा चंद्र जणू रुसलाच आमच्यावर सरकारी दप्तरी नुसताच मदतीचा कोरा कागद, हिशोबाचा मेळ अन हातात केळ नेहमी प्रमाणे सरकारी काम, सहा महिने थांब, इतक्या प्रमाणात साथीने बळी घेतल्यानंतर देखील प्रशासन मात्र डिंमच रोज केवळ आकडेवारी वाचून दाखवायचे हाच धंदा सुरु आहे.

          फवारणी, धुवारणी तर आमच्या डोळ्यात पाणी आणत आहे उगीच बरे झाल्याचा बातम्या कानाला खूष करून जातात पोट मात्र मनाला नेहमीच दुःख देत आहे कोणतं पाप केलंय म्हूणन ही वेळ आमच्यावर आली असा प्रश्न मनाला पडला असून आता जगायचं की नाही कोणावर भरवसा ठेवायचा ? आम्ही एकवेळ पणी पिऊन जगू पण लहान लेकरांचे काय? असा प्रश्न सतत भेडसावत आहे अश्या परिस्थिती नेमकं काय करावं सुचत नाही
दुकानदार उधार देत नाही सरकार मदत करत नाही आता
भुकेने मरण्यापेक्षा त्याविरोधात लढाई केलेली बरी परंतु ते बळ देखील निघून गेलं आहे म्हूणन म्हणतोय
जगण्याने छळले मला मरणाने सुटका केली
रोक ठोक….

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: