गंभीर!!! सोलापूरमध्ये तब्बल 29 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; काय आहे संपूर्ण आकडेवारी पहा… – ANC News
COVID - १९ बातम्यामाझं सोलापूर

गंभीर!!! सोलापूरमध्ये तब्बल 29 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; काय आहे संपूर्ण आकडेवारी पहा…

सोलापूर मध्ये आज एकूण 126 जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 97 अहवाल निगेटिव्ह असून चिंतेची बाब म्हणजे तब्बल 29 अहवाल हे पॉझिटिव आलेले आहेत. पॉसिटीव्ह आलेल्या अहवालांपैकी 14 पुरुष तर 15 स्त्रिया असून १ व्यक्ती मृत आहे

सोलापूर 7 मे 2020 : सोलापूर मधील कोरोनाचा धोका वाढतच असल्याचे चित्र आजच्या मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सोलापूर मध्ये आज एकूण 126 जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 97 अहवाल निगेटिव्ह असून चिंतेची बाब म्हणजे तब्बल 29 अहवाल हे पॉझिटिव आलेले आहेत. पॉसिटीव्ह आलेल्या अहवालांपैकी 14 पुरुष तर 15 स्त्रिया असून 1 व्यक्ती मृत आहे. थोडीशी समाधानकारक बाब म्हणजे आज एकूण पाच रुग्ण हे कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये तीन पुरुष दोन स्त्रिया आहेत. केगाव मधील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये असलेल्यांपैकी आज 24 जणांना घरी सोडले आहे.

आज प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये आकाशवाणी केंद्र जवळील एकूण बारा व्यक्ती आहेत त्यामध्ये सहा पुरुष तर सहा स्त्रिया आहेत त्यानंतर अलकुंटे चौक येथे दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत त्यापैकी एक स्त्री तर एक पुरुष आहे. बापुजी नगर परिसरात परिसरात ही चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये दोन पुरुष दोन स्त्रिया आहेत. भारतरत्न इंदिरा गांधी नगर याठिकाणी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव सापडले असून त्यामध्ये एक पुरुष व स्त्री आहे. नई जिंदगी परिसरात चार व्यक्ती पॉझिटिव असून त्यापैकी एक पुरुष व तीन स्त्रिया आहेत. रंग भवन परिसरात एक पुरुष व्यक्ती कोरोना पॉझिटिव सापडलेला आहे. तसेच शनिवार पेठ या ठिकाणी एक स्त्री कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली आहे. रेल्वे लाईन परिसरात एक पुरुष करून पॉझिटिव आहे व न्यू पच्चा पेठ परिसरात एक पुरुष व एक स्त्री करून पॉझिटिव आढळलेले आहेत.

आजच्या अहवालामध्ये जी मृत महिला कोरोना पॉजिटिव आढळलेली आहे, ती न्यू पच्चा पेठ परिसरातील असून तिचे वय 48 वर्षे आहे. या महिलेला 6 मे 2020 रोजी पहाटे हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते आणि त्याच दिवशी दुपारी तीन वाजता त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचा COVID -19 चा रिझल्ट आज प्राप्त झाला असून तो पॉजिटिव आढळलेला आहे.

आजपर्यंत सोलापूर शहरांमध्ये एकूण 182 रूग्ण कोरोना पॉझिटिव सापडलेले आहेत त्यापैकी 103 पुरुष तर 79 स्त्रिया आहेत. आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 11 असून त्यापैकी पाच पुरुष व सहा स्त्रिया आहेत आणि सध्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ही 142 असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये 78 पुरुष तर 64 स्त्रिया असून आजवर जे रुग्णालयातून बरे होऊन गेलेले आहेत त्यांची संख्या 29 असून त्यामध्ये 20 पुरुष व 9 स्त्रिया आहेत.

          सोलापूर मधील ही आकडेवारी पाहून आपल्याला काय वाटते हे नक्कीच आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण सोलापूर मधील कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काय करायला हवे यासंदर्भातील आपले विचार देखील कमेंट बॉक्समध्ये लिहा.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: