कोरोनातून मुक्त होणाऱ्यांनी आज गाठले दीडशतक; रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या घटली – ANC News
COVID - १९ बातम्यामाझं सोलापूर
Trending

कोरोनातून मुक्त होणाऱ्यांनी आज गाठले दीडशतक; रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या घटली

आजपर्यंत 150 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामध्ये 94 पुरुष तर 56 स्त्रिया आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 190 असून 90 पुरुष व 100 स्त्रिया आहेत.

सोलापूर 16 मे 2020 : आज एकूण 234 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 213 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. आज एकूण 21 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सुदैवाने एकही व्यक्तीचे आज निधन झाले आहे. केगांव येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून आज एकूण 90 व्यक्तींना घरी पाठवण्यात आले. कोरोनातून मुक्त होऊन 37 जण घरी गेले असून.

          आज आढळून आलेले कोरोना रुग्ण कोणत्या परिसरातील आहेत हे पहा :- लष्कर – 2 पुरुष, शुक्रवार पेठ – 1 पुरुष, अशोक चौक – 1 पुरुष व 1 स्त्री, जुना कुंभारी नका – 1 पुरुष व 1 स्त्री, अलकुंटे चौक – 1 पुरुष, न्यू पाच्छा पेठ – 1 स्त्री, कुमठा नका – 1 पुरुष व 3 स्त्रीया, गीता नगर – 1 पुरुष व 2 स्त्री, एकटा नगर – 1 स्त्री, साई बाबा चौक – 1 पुरुष व 1 स्त्री, तुळशी नगर – 1 स्त्री, नाथ संकुल सादर बाझार – 1 स्त्री.

          जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर 364 व्यक्ती सोलापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 197 पुरुष तर 167 स्त्रिया आहेत. एकूण मृतांची संख्या ही 24 आहे. यामध्ये 13 पुरुष व 11 स्त्रिया आहेत. आजपर्यंत 150 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामध्ये 94 पुरुष तर 56 स्त्रिया आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 190 असून 90 पुरुष व 100 स्त्रिया आहेत.

          सोलापूरमध्ये आजपर्यंत एकूण 4106 व्यक्तींच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 3820 अहवाल प्राप्त झाले असून 286 अहवाल अजूनही प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालांमध्ये 3456 अहवाल निगेटिव्ह आले असून 364 अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: