
सोलापूर10 मे 2020 : काही केल्या सोलापूरकरांची चिंता काय संपेना असे चित्र जणू आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालावरून दिसून येते. आज एकूण 132 अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये 84 अहवाल हे निगेटिव आले असून तब्बल 48 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 29 पुरुष तर 19 स्त्रिया आहेत. सोलापूरकरांनी आता स्वतःच्या संरक्षणासाठी चे नियम हे स्वतः घालून घ्यायला हवेत, कारण जर असे केले नाही तर सोलापूर मध्ये कोरोनाला हरवणे अशक्य होईल. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाचे सर्व नियम पाळा आणि स्वतः स्वतःचे रक्षक व्हा, जेणेकरून आपण लवकरात लवकर करून आला हरवू शकू आणि सुटकेचा श्वास सोडू शकू.
यातच थोडीशी समाधानकारक बाब म्हणजे आज एकूण 12 जण कोरोना रोगातून मुक्त झाले आहेत त्यामध्ये 9 पुरुष तर 3 स्त्रिया आहेत. त्याचबरोबर केगाव येथील इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन मधून 148 व्यक्तींया ना सोडण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत एकूण 264 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 152 पुरुष तर 112 स्त्रिया आहेत. आजवर एकूण 14 जणांचे निधन झाले आहे, तर 41 जण कोरोना रोगापासून मुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित त्यांची संख्या आता 209 असून त्यामध्ये 117 पुरुष तर 92 स्त्री आहे. आज सापडलेले कोरोना बाधित रुग्ण हे कोणत्या परिसरात आहेत ते वरील छायाचित्र द्वारे आपणास माहित होईल.