आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट मधील सर्व क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन नागरिकांशी साधला संवाद – ANC News
COVID - १९ बातम्यामहाराष्ट्रमाझं सोलापूर
Trending

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट मधील सर्व क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन नागरिकांशी साधला संवाद

अक्कलकोट/प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर १ मे पासून राज्य आणि परराज्यात अडकलेले नागरिक अक्कलकोट विधानसभेत येत आहेत त्यांना झोन प्रमाणे त्यांची क्वारंटाईनची सोय करण्यात आली आहे, अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तहसीलदार अंजली मरोड व उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे व इतर अधिकारी यांच्या समावेत अक्कलकोट मधील सर्व क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन सगळे नागरिकांसोबत संवाद साधला व त्यांचे अडचणी जाणून घेतल्या त्यादरम्यान काही मातांनी त्यांच्या बाळांना दुधाची मागणी करताच तत्काळ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दूध उपलब्ध करून दिली, तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या सोबत आहे असे विश्वास सर्व क्वारंटाईन केलेल्या सर्व नागरिकांना आमदार सचिन कल्याणशेट्टी या प्रसंगी केला…

याप्रसंगी विलगीकरणं केंद्रातील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले पहा ते काय म्हणाले

“अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी कोरोना संकटात परजिल्ह्यातून अक्कलकोट मध्ये परतलेल्या आम्हा बांधवांची विलगीकरणं केंद्रात (Quarantine Centre) प्रत्यक्षात येऊन तत्परतेने काळजीपूर्वक विचारपूस केली. या विलगीकरणं केंद्रा मध्ये दादांच्या माध्यमातून बांधवाना पुरेपूर व्यवस्था करण्यात आली आहे व दादा स्वतः या केंद्रामधील आम्हा बांधवांसोबत संपर्कात आहेत. स्वतःचा जीवाची पर्वा न करता परजिल्ह्यातून तालुक्यात आलेल्या लोकांची थेट विलगीकरणं केंद्रात जाऊन विचारपूस करणारे सचिनदादा कल्याणशेट्टी हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत.”
– क्वारंटाईन नागरिक

“आम्हाला अक्कलकोट येथील क्वारंटाईन केंद्रात रोज चांगल्या प्रतीचे रुचकर पोटभर जेवण ,नाश्ता ,चहा व व लहान बाळांसाठी दुधाची सोय सुद्धा स्थानिक आमदार मा.श्री.सचिनदादा कल्याणशेट्टी यांचा माध्यमातून देण्यात येत आहे. अक्कलकोट तालुक्यात येताना विविध प्रकारे विलगीकरणं केंद्रात खूप गैरसोयी आहेत अशा खोट्या अफवा पसरवल्या जात होत्या.परंतु या ठिकाणी सर्व काही चांगल्या प्रकारे आम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याबद्दल स्थानिक आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी व प्रशासनाचे मनःपूर्वक धन्यवाद.”
– क्वारंटाईन नागरिक

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: