आज 35 जणांनी कोरोना विरोधी लढाई जिंकली, कोरोना वॉरियर्सची संख्या 210 वर; पहा विस्तृत आकडेवारी… – ANC News
COVID - १९ बातम्यामाझं सोलापूर
Trending

आज 35 जणांनी कोरोना विरोधी लढाई जिंकली, कोरोना वॉरियर्सची संख्या 210 वर; पहा विस्तृत आकडेवारी…

सोलापूर 21 मे 2020 : आज एकूण 183 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 165 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. आज एकूण 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. 1 व्यक्तीचे आज निधन झाले आहे. केगांव येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून आज एकूण 57 व्यक्तींना घरी आले. आज कोरोनातून मुक्त होऊन 35 जण घरी गेले.

          आज सोलापुरातील 16 विविध भागातून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्याची माहिती वरील छायाचित्रांद्वारे आपल्याला समजेल.

          जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर 488 व्यक्ती सोलापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 272 पुरुष तर 216 स्त्रिया आहेत. एकूण मृतांची संख्या ही 34 आहे. यामध्ये 21 पुरुष व 13 स्त्रिया आहेत. आजपर्यंत 210 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामध्ये 124 पुरुष तर 86 स्त्रिया आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 244 असून 127 पुरुष व 117 स्त्रिया आहेत.

          आज मयत झालेल्या व्यक्तींची माहिती पुढीलप्रमाणे :- मयत झालेली व्यक्ती उत्तर सादर बाझार, लष्कर परिसरातील 72 वर्षाचे पुरुष असून 17 मे 2020 रोजी दुपारी 03:22 वाजता सिव्हिल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 20 मे 2020 रोजी दुपारी 01:30 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा COVID – 19 चा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: