आज कोरोनातून 22 OUT तर 22 IN; उपचार सुरु असलेल्या रूग्णांच्या संख्येमध्ये स्त्री – पुरुष समानता – ANC News
COVID - १९ बातम्यामाझं सोलापूर
Trending

आज कोरोनातून 22 OUT तर 22 IN; उपचार सुरु असलेल्या रूग्णांच्या संख्येमध्ये स्त्री – पुरुष समानता

आजच्या आकडेवारीवरून मृतांची संख्या आणि रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये पुरुष आणि स्त्रियांची संख्या ही समान आढळून आली आहे.

सोलापूर 14 मे 2020 : जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर मधून कोरोना मुक्त व्हावा याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, परंतु कोरोना बद्दल सोलापूरकरांना कधी चांगली तर कधी वाईट बातमी मिळतच आहे. हे सर्व थांबून कधी एकदा कायमची कोरोना बद्दलची चांगली बातमी येईल याकडे सोलापूरकर यांचे लक्ष लागले आहे. सोलापूर कोरोना मुक्त होण्याचे सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण प्रशासनाला वेळोवेळी साथ दिल्यास कोरोनाच्या संसर्गातून सोलापूरला नक्कीच मुक्त करू शकू.

सोलापूरकरांसाठी आज एक समांतर बातमी आली आहे ती म्हणजे आज एकूण 22 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून 22 रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी गेले आहेत. आज एकूण 131 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 99 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. एका स्त्रीचे आज निधन झाले आहे. केगांव येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मधून आज एकूण 88 व्यक्तींना घरी पाठवण्यात आले.

          आज आढळून आलेले कोरोना रुग्ण कोणत्या परिसरातील आहेत हे पहा :- नीलम नगर एमआयडीसी रोड – 2 स्त्रिया, कोणापुरे चाळ रेल्वे लाइन्स सोलापूर – 1 स्त्री, कुमठा नाका – 1 पुरुष, नवनाथ नगर एमआयडीसी सोलापूर – 2 पुरुष 1 स्त्री, अशोक चौक – 3 तीन पुरुष 4 स्त्रिया, न्यू पाच्छा पेठ – 2 पुरुष 4 स्त्रिया, लष्कर सोलापूर – 1 स्त्री, नई जिंदगी – 1 स्त्री. नई जिंदगी येथे आढळून आलेल्या स्त्रीचे सारी आजारामुळे निधन झाले असून तिचे मूळ गाव सुलतानपूर व जिल्हा उस्मानाबाद आहे.

          जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर 330 व्यक्ती सोलापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 181 पुरुष तर 149 स्त्रिया आहेत. एकूण मृतांची संख्या ही 22 पोहोचली असून त्यामध्ये 11 पुरुष व 11 स्त्रिया आहेत. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांच्या संख्येने आज शतक गाठले असून 106 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामध्ये 69 पुरुष तर 37 स्त्रिया आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 202 असून 101 पुरुष व 101 स्त्रिया आहेत.

          आज एका महिलेचे निधन झाले असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे :- मयत झालेली महिला 65 वर्षांची असून तिचे मूळ गाव सुलतानपूर व जिल्हा उस्मानाबाद आहे. ही महिला नही जिंदगी येथे नातेवाईकांकडे 18 मार्च रोजी आली होती. लॉकडाऊनमुळे ती येथेच नातेवाईकांकडे राहत होती. 12 मे 2020 रोजी दुपारी 12:16 वाजता सिव्हिल मध्ये गंभीर अवस्थेत त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी सायंकाळी 5:15 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा COVID – 19 चा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या आकडेवारीवरून मृतांची संख्या आणि रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये पुरुष आणि स्त्रियांची संख्या ही समान आढळून आली आहे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: