आज कोरोनातून विळख्यातून 5 जण बाहेर पडले तर 5 जणांचे निधन झाले, पहा संपूर्ण आकडेवारी…
सोलापूर 21 मे 2020 : आज एकूण 120 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 102 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. आज एकूण 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. 5 व्यक्तीचे आज निधन झाले आहे. केगांव येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून आज एकूण 88 व्यक्तींना घरी आले. आज कोरोनातून मुक्त होऊन 5 जण घरी गेले.
आज सोलापुरातील 15 विविध भागातून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्याची माहिती वरील छायाचित्रांद्वारे आपल्याला समजेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर 583 व्यक्ती सोलापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 323 पुरुष तर 260 स्त्रिया आहेत. एकूण मृतांची संख्या ही 51 आहे. यामध्ये 32 पुरुष व 19 स्त्रिया आहेत. आजपर्यंत 254 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामध्ये 148 पुरुष तर 106 स्त्रिया आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 278 असून 143 पुरुष व 135 स्त्रिया आहेत.