आजपर्यंत 113 रुग्ण कोरोनातून मुक्त; पहा काय आहे सोलापूरची कोरोना आकडेवारी… – ANC News
COVID - १९ बातम्यामाझं सोलापूर
Trending

आजपर्यंत 113 रुग्ण कोरोनातून मुक्त; पहा काय आहे सोलापूरची कोरोना आकडेवारी…

सोलापूर 14 मे 2020 : आज एकूण 115 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 92 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. आज एकूण 13 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून 2 पुरुषांचे आज निधन झाले आहे. कोरोनातून मुक्त होऊन 7 जण घरी गेले असून केगांव येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून आज एकूण 43 व्यक्तींना घरी पाठवण्यात आले.

          आज आढळून आलेले कोरोना रुग्ण कोणत्या परिसरातील आहेत हे पहा :- लष्कर – 2 पुरुष 1 स्त्री, विरजपूर नका – 1 पुरुष, नवनाथ नगर एमआयडीसी सोलापूर – 1 स्त्री, बापूजी नगर – 1 स्त्री, शास्त्री नगर – 1 पुरुष, दत्त चौक – 1 स्त्री, कुमारस्वामी नगर – 2 पुरुष, अरविंदधाम पोलीस वसाहत – 1 पुरुष, भगवान नगर – 1 स्त्री, सिव्हिल हॉस्पिटल हॉस्टेल – 1 पुरुष.

          जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर 343 व्यक्ती सोलापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 188 पुरुष तर 155स्त्रिया आहेत. एकूण मृतांची संख्या ही 24 पोहोचली असून त्यामध्ये 13पुरुष व 11 स्त्रिया आहेत. आजपर्यंत 113 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामध्ये 72 पुरुष तर 41 स्त्रिया आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 206 असून 103 पुरुष व 103 स्त्रिया आहेत.

          मयत झालेल्या व्यक्तींची माहिती पुढीलप्रमाणे :- मयत झालेली एक व्यक्ती नाथ संकुल , सिव्हील हॉस्पीटल जवळ येथील 63 वर्षाचे पुरुष असून 10 मे 2020 रोजी दुपारी 03.11 वा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात
आले होते . 10 मे 2020 रोजी तीचा कोव्हीड -19 अहवाल पॉझिटिव्ह आला होता . उपचारादरम्यान 15 मे 2020 रोजी दुपारी 02.15 वा निधन झाले.
मयत झालेली दुसरी व्यक्ती महादेव चौक , शास्त्रीनगर परिसरातील 58 वर्षाचे पुरुष असून 12 मे 2020 रोजी सकाळी सिव्हील हॉस्पिटलमध्ये SARI च्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . 13 मे 2020 रोजी तीचा कोव्हीड -19 अहवाल पॉझिटिव्ह आला होता . उपचारा दरम्यान 15 मे 2020 रोजी 11.00 वा निधन झाले .

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: