अखेर अफवांना मिळाला पूर्णविराम; सोलापूरमध्ये 22 नाही तर 14 नवे रुग्ण; काय आहे खरी आकडेवारी पहा – ANC News
COVID - १९ बातम्यामाझं सोलापूर

अखेर अफवांना मिळाला पूर्णविराम; सोलापूरमध्ये 22 नाही तर 14 नवे रुग्ण; काय आहे खरी आकडेवारी पहा

आज संध्याकाळपासून सोलापूर मध्ये एक अफवा पसरत होती ती म्हणजे 'सोलापूर मध्ये तब्बल 22 कोरोना रुग्ण वाढले आहेत'. परंतु या अफवेला अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णविराम दिला, त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सोलापूरमध्ये आज नवीन 14 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत.

सोलापूर 8 मे 2020 : सोलापूर मध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज सोलापूरमध्ये 22 नाही तर 14 नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. आम्ही असे का म्हणत आहोत हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. कारण की आज संध्याकाळपासून सोलापूर मध्ये एक अफवा पसरत होती ती म्हणजे ‘सोलापूर मध्ये तब्बल 22 कोरोना रुग्ण वाढले आहेत’. परंतु या अफवेला अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णविराम दिला, त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सोलापूरमध्ये आज नवीन 14 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत.

आज एकूण 170 अहवाल प्राप्त झाले होते त्यामध्ये 156 अहवाल निगेटिव्ह तर 14 अहवाल पॉझिटिव आढळलेले आहेत. त्या 14 अहवालांपैकी 8 पुरुष तर 6 जण स्त्रिया आहेत. रुग्णालयांमधून बरे होऊन आज कोणीही घरी गेलेले नाही, परंतु केगांव येथून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मधून सोडलेले व्यक्ती एकूण 110 आहे.

          आज मिळालेल्या अहवालानुसार गवळी वस्तीतील जुना कुंभारी रोड येथील 1 पुरुष, शास्त्रीनगर येथील 1 पुरुष, हुडको नंबर 3 कुमठा नाका येथील 1 पुरुष, समर्थ नगर – सिव्हिल हॉस्पिटल मागे 1 स्त्री, गीता नगर न्यू पच्चा पेठ येथे 1 पुरुष, भारतरत्न इंदिरा नगर 1 स्त्री, संजय नगर कुमठा नाका येथे 1 पुरुष, रविवार पेठ येथे 1 स्त्री, न्यू पाच्छा पेठ येथे 2 पुरुष व 1 स्त्री, मोदी खाना येथे 1 स्त्री, सदर बाजार येथे 1 स्त्री आणि सिद्धेश्वर पेठ येथे 1 पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

पुढे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पर्यंत पॉझिटिव असलेल्या बाधितांची संख्या 196 असून 111 पुरुष तर 85 स्त्री आहेत. आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ही 13 असून त्यामध्ये 6 पुरुष तर 7 स्त्रिया आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या एकूण 154 असून त्यामध्ये 85 पुरुष तर 69 स्त्रीया आहेत. आजपर्यंत रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ही 29 आहे. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आज एकही व्यक्ती रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली नाही.

आज प्राप्त झालेल्या 14 पॉझिटिव्ह अहवालांपैकी दोन व्यक्तींचे निधन झाले असून त्यातील एक व्यक्ती शास्त्री नगर परिसरातील 56 वर्षाची महिला आहे. त्यांना 25 एप्रिल 2020 रोजी सकाळी सिविल मध्ये दाखल करण्यात आले होते. 26 एप्रिल 2020 रोजी त्यांचा covid-19 अहवाल पॉझिटिव्ह आला व उपचारादरम्यान 8 एप्रिल 2020 रोजी पहाटे 5:20 वाजता त्यांचे निधन झाले. मयत झालेले दुसरे व्यक्ती हे रंगभवन परिसरातील 76 वर्षाचे पुरुष असून 5 मे 2020 रोजी सकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 7 मे 2020 रोजी त्यांचा covid-19 अहवाल पॉझिटिव आला होता, परंतु उपचारादरम्यान 8 मे 2020 रोजी पहाटे 2 वाजता त्यांचे निधन झाले.

          ANC News च्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी खरी आणि अचूक माहिती पुरवण्यात येत असते. त्यामुळे सोलापूरकरांना ANC News च्या माध्यमातून हेच आवाहन करू इच्छित आहोत की आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका सत्य पाहायचे असल्यास ANC News च पहा. तसेच आपल्या प्रतिक्रिया वेळोवेळी आम्हाला कळवत रहा.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: